|
मोहाली, दि. २९ : क्रिकेटला, त्याच्या आनंदाला, उत्साहाला, खुनशीला आणि त्याच्या मैदानावरील झुंजीला कशाच्याही मर्यादा नाहीत! ना जातीच्या, ना धर्माच्या, ना व्यक्तीच्या, ना कोणत्या देशाच्या सीमेच्या! मात्र 'भारत-पाकिस्तान' हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर जगात कुठेही समोरासमोर आले की मग तो केवळ 'खेळ' ठरत नाही. दोन्ही देशांतील तमाम चाहत्यांसाठी, खेळाडूंसाठी ते एक 'महायुद्ध'च ठरते. बुधवारी मोहालीच्या 'रणांगण'वर महेंद्रसिग धोनी आणि शाहिद आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखाली भारत-पाकचे 'क्रिकेटयुद्ध' पाहताना कोट्यवधी चाहत्यांचे हृदय 'काय होणार, कोण जिकणार' या एकाच चितेने धडधडणार हे निश्चित..! |
No comments:
Post a Comment