
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करून भारताने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर सचिन पत्रकारांशी बोलत होता. सचिन म्हणाला, "पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या वेळी देवाचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद होता, आज पर्यंतच्या खेळीत कधीही एवढे जीवदाने मिळाली नव्हती. माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडले आहे.'
शनिवारी (ता. २) श्रीलंकेच्या विरुद्ध अंतिम सामना होणार असून, आम्ही फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करू. श्रीलंकेचा सुद्धा चांगला संघ असून, ते चांगली कामगिरी करतात. मुंबईतील सामना चांगल्या प्रकारे होईल. खेळाच्या वेळी संयम राखून खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यावर नक्कीच विजय मिळेल.
No comments:
Post a Comment