Thursday, 31 March 2011

'मेलो ड्रामा'मला आवडत नाही

ऐश्‍वर्या नारकर
"या वळणावर' या मालिकेबाबत काही सांग ?
- "या वळणावर' हा "फॅमिली ड्रामा' आहे. पण असं असूनही या मालिकेत बऱ्याच रहस्यांची गुंफण आहे. पुढे काय होणार याची सातत्याने ओढ प्रेक्षकांना लागलेली असते. "डेलीसोप'मध्ये आता पुढे काय होणार ही जी "स्टेज' आहे, ती खूप महत्त्वाची असते... ती "स्टेज' या मालिकेत वारंवार पाहायला मिळते. एखाद्या घटनेचा नात्यांमध्ये काय गोंधळ उडू शकतो, याचं चित्रण यात दाखविण्यात आलंय. त्यामुळे ही मालिका नक्कीच वेगळी आहे. नेहमीचाच "ड्रामा' या मालिकेत नसून नात्यांमध्ये रहस्यामुळे उडणारा गोंधळ यात दिसून येतो.

ही मालिका स्वीकारताना कोणत्या गोष्टींचा जास्त विचार केला होतास ?
- या मालिकेची कथा खूप छान आहे. "या सुखांनो या' मालिकेनंतर मी एकही मालिका स्वीकारली नव्हती. कारण मला सांगून आलेल्या बऱ्याच भूमिका या माझ्या वयापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. म्हणजे एखाद्या कोण्या अभिनेत्रीची आई वगैरे.... मला सध्या तरी अशा भूमिका करायच्या नाहीत. त्यामुळे या भूमिकांना माझा नकारच होता. पण या मालिकेत मिळालेली भूमिका ही इतर भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या भूमिकेला नुसतं स्थान नाहीय, तर वेगळी "इमेज' आहे. एक महत्त्व आहे, असं म्हटलं तरी चालेल. या सर्व गोष्टींचा नीट विचार करून ही मालिका मी स्वीकारली.

या मालिकेत तू अविनाशसोबत आहेस, कसं वाटतंय ?
- खूप छान वाटतंय... मी अविनाशसोबत एक मालिका केली होती. पण त्यानंतर बऱ्याच वर्षांचा गॅप पडला होता. त्यानंतर या मालिकेत आम्ही एकत्र काम करतोय. एक तर सेटवर आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. अविनाशसोबत काम करताना काहीच दडपण नाही वाटत, कारण या मालिकेतही त्यानं माझ्या पतीचीच भूमिका केली आहे. आम्हाला दोघांना एकमेकांच्या सर्वच गोष्टी माहित असल्यानं मालिकेत आमचं "ट्यूनिंग' खूप चांगलं जमतंय. त्यामुळे भूमिकाही "नॅचरल' वाटतेय.

बऱ्याच दिवसांनी कौटुंबिक मालिकेत दिसतेस ?
- हो, ही गोष्ट खरी आहे की मी बऱ्याच दिवसांनी कौटुंबिक मालिकेत आहे. आत्तापर्यंत मी केलेल्या सर्वच मालिका कौटुंबिक पातळीवरच्याच आहेत. कारण अशाच मालिका मला आवडतात. मला उगाचच "मेलोड्रामा' आवडत नाही. मला वाटतं की आपण "लॉजिकली' अभिनय साकारला तर तो प्रेक्षकांनाही आवडतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अभिनय करण्याकडे माझा जास्त कल असतो. शिवाय या मालिकेत माझी प्रत्येक गोष्टी जाणून घेतली आहे.

अजून कोणते प्रोजेक्‍टस्‌ तुझ्याकडे आहेत ?
- "या वळणावर' या मालिकेसोबत मी "डोर' ही हिंदी मालिका करतेय. एक चित्रपटही केलाय. शिवाय "कॅम्पयन' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केलीय. लहान मुलांसाठीचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला आम्ही बऱ्याच ठिकाणी पाठवलंय. ग्रीसमध्ये या चित्रपटाला "बेस्ट ज्यूरी ऍवॉर्ड'देखील मिळालंय. लखनौ चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविण्यात आलाय.





http://72.78.249.107/esakal/20110329/5200734671623102681.htm

No comments:

Post a Comment