मुंबई - सौंदर्य आणि नृत्याचा अद्भुत मिलाफ घेऊन आलेल्या "एकापेक्षा एक... अप्सरा आली'च्या अंतिम पर्वात विजेतेपदावर मोहोर उमटविली ती मृण्मयी देशपांडेने. हजारो चाहत्यांच्या साक्षीने तिने आपल्या कसदार अभिनय आणि नृत्यकौशल्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.
मृण्मयीला "झी मराठी'कडून एक लाख रुपये आणि वामन हरी पेठे यांच्याकडून सोन्याचा राणी हार बक्षीस देण्यात आला. तसेच गिरीजा ओक, नेहा पेंडसे व ऊर्मिला कानेटकर या तिन्ही उपविजेत्या अप्सरांना 75 हजार रुपये आणि सोन्याचा पेंडंट सेट मिळाला. त्यांच्या गुरूंना मिळाले 50 हजार रुपयांचे पारितोषिक.
डिसेंबरपासून "एकापेक्षा एक... अप्सरा आली'चे पर्व सुरू झाले होते. दर बुधवारी व गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होत होता. अखेर आज रात्री अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडासंकुलात या कार्यक्रमावर अखेरचा पडदा पडला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या महाअंतिम फेरीत गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे व ऊर्मिला कानेटकर या चारही अप्सरांनी जीवाचे रान केले. लोकनृत्य ते पाश्चात्त्य नृत्य, लावणी ते हिपहॉप अशा नृत्याच्या विविध शैलींचे आविष्कार घडवीत चारही अप्सरांची नृत्याविष्काराची धुवांधार बरसात आणि त्यावर उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद यामुळे शहाजीराजे क्रीडासंकुल दणाणून गेले. तुल्यबळ स्पर्धा आणि तगडे प्रतिस्पर्धी यामुळे प्रत्येक अप्सरेने, तसेच त्यांच्या गुरूंनी नेत्रदीपक नृत्याविष्कारांची दणकेबाज मेजवानी रसिकांना दिली. चारही अप्सरांची फक्कड लावणी झाल्यानंतर गिरीजा ओकचा "वो राजे...'वरचा वीरश्रीयुक्त जोशपूर्ण परफॉर्मन्स, नेहा पेंडसेची तिखटजाळ लावणी, मृण्मयी देशपांडेचे "अंबड झुंबड'वरील तरल नृत्य, ऊर्मिला कानेटकरचा "नदीच्या पल्याड...' दमदार जोगवा अशा वैविध्यपूर्ण परफॉर्मन्सनी टाळ्या आणि शिट्यांचा जल्लोष उडविला. महाअंतिम फेरीतील चारही अप्सरांना गेल्या चार पर्वांतील महाविजेत्यांनीही नृत्याची मानवंदना दिली. सॅड्रिक डिसोझा, भार्गवी चिरमुले, मयूरेश पेम व मिहीर सोनी यांनी नृत्याचा जबरदस्त फंडा देत चारही अप्सरांना चिअरअप केले. या संपूर्ण सोहळ्यावर महागुरू सचिन पिळगावकर यांनी कळस चढविला तो "गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताच्या जोशपूर्ण नृत्याने. पुष्कर श्रोत्रीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा संपूर्ण सोहळा येत्या 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी "झी मराठी'वर

No comments:
Post a Comment