Friday, 1 April 2011

जर्मनीतील संस्थेत उसाचे संशोधन (आकाशभरारी)


मी गौरी अरविंद नेरकर... पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातून एमफिल केले आणि आता मी जर्मनी येथे "मॅक्‍स फ्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ मॉलेक्‍युलर फ्लॅन्ट फिजिओलॉजी' या संस्थेत संशोधन करीत आहे. यासाठी माझी जर्मन ऍकॅडमिक एक्‍स्चेंज सर्व्हिस (डीएएडी) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनवृत्तीसाठी (फेलोशिप) निवड झाली.

एमफिलसाठी मी सोयाबीनसंबंधी संशोधन केले. दरम्यान, मला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधकपदावर काम करण्याची संधी मिळाली. आपल्या देशात उसाच्या पिकाची स्थिती लक्षात घेता, उसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, उसाचे जादा पीक घेता येणे; तसेच साखरेचे प्रमाण वाढविणे यांसारख्या समस्या आहेत, म्हणून ऊसविषयक संशोधन करण्याचा मी निर्धार केला. "उसातील हरितद्रव्य ग्रंथीमध्ये जनुकीय बदल घडविण्याचे तंत्रज्ञान' (क्‍लोरोप्लास्ट ट्रान्स्फार्मोशन इन शुगरकेन) या विषयावर संशोधन चालू आहे. या संशोधनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील डॉ. देवरमठ व जर्मनी येथे मॅक्‍स फ्लॅन्क इन्स्टिट्यूटमधील डॉ. राल्फ बॉक यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

माझ्या संशोधनकार्याला 1 ऑक्‍टोबर 2010 पासून प्रारंभ झाला. जर्मनीतील संशोधनपद्धतीतील वेगळेपणाबद्दल सांगावेसे वाटते, की संशोधन कसे करावे, याचा आदर्श नमुना (मॉडेल) म्हणजे पोटस्‌ डॅम येथील इन्स्टिट्यूटची ख्याती! संशोधन विषयानुसार त्याचे पृथक्करण, अत्यावश्‍यक नमुन्याचे वर्गीकरण व विश्‍लेषण करताना पद्धतशीर नोंदी अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. पाच दिवसांचा आठवडा ही कल्पना प्रभावी असल्याने जर्मनी येथे शनिवार-रविवार सुटीचा दिवस. म्हणून बहुतांशाने प्रत्येक जण आपापल्या छंद-व्यवसायात घालवितात. जून 2010 मध्ये जर्मनी येथे या फेलोशिपसाठी निवड झाल्यावर प्रारंभी चार महिने बर्लिन येथे जर्मन भाषेचा अभ्यास करण्यासाठी मी राहिले. आपला देश सोडून येथे आल्यावर मेहनतीने संशोधन पूर्ण करून ऊसविषयक संशोधनात नवनवीन बाबींचा अभ्यास करून डॉक्‍टरेट मिळवण्याबरोबर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधकांसारखे संशोधन करण्याचा मी ध्यास घेतला.

भारतामध्ये दीड-दोन वर्षांनी परतल्यावर माझ्या मायभूमीतील आपल्या शेतकऱ्यांसाठी मी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचा मी ध्यास घेतला आहे. माझ्या आईचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. मात्र, आयुष्यभर माझ्या यशाला प्रोत्साहन देणारी आई आता माझ्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला नसली तरी अदृश्‍यरूपाने माझ्या पाठीशी आहे, असा मला सदैव भास होतो. माझे संशोधनकार्य तिच्या आशीर्वादाने पूर्ण होईल, असा मला विश्‍वास वाटतो.

1 comment:

  1. What are the best casino? - No Deposit Casinos
    No Deposit 먹튀 사이트 조회 Casinos: If you are looking for a reliable online 아르고 캡쳐 casino to play for real 벳 365 가상 축구 money, 오피주소 we have you 바카라양방계산기 covered. The best casino online is a UK-based

    ReplyDelete